
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वाढोडा- रानवड गट ग्रामपंचायत उपसरपंच पदी मनोहर ढिगोले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे
अडिच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दि.२८/१०/२०२१ सर्व राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या नियुक्त्या घेण्यात आल्या होत्या मात्र वाढोडा -रानवड ग्रामपंचायत चे सरपंच अजयभाऊ पिपरे हे जनतेतून निवडून आले असल्याने फक्त उपसरपंच यांची नियुक्ती होणे बाकी होते आज मनोहर ढिगोले यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे वाढोडा-रानवड या गावांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून शिशीरजी निनावे हे होते तर सरपंच अजयजी पिपरे, सदस्य दिनेशराल काळे, रेखाताई खेवले, रंजनाताई कोवे, सचिव अजयजीफाटे, रोजगार सेवक दत्ताभाऊ नवघरे, कर्मचारी भिमरावजी वाघमारे,राजुभाऊ भोयर हे हजर होते.
