वरोरा तालुक्यातील चिकणी येथे असलेल्या रेल्वे मार्गावर सिमेंट स्लीपर पोल ठेवल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी 3 ते 4 वाजता च्या दरम्यान घडली .घातपात घडविण्याच्या हेतूने हे कृत्य केले असल्याने चांगलीच खळबळ माजली होती .काही वेळा साठी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल होत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली .त्यानुसार संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
रेल्वे रुळावर सिमेंट पोल ठेवून घातपात घडविण्याचा प्रयत्न या मार्गावर करण्यात आला .बॉम्बशोधक पथकाला घटनास्थळी पाचारण करीत आजूबाजूचा परिसराची रेकी करण्यात आली.हा दिल्ली चेन्नई असा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच रेल्वे गाड्यांची ये जा सुरू असते अश्यातच हा घातपाताचा प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न सतर्कतेमुळे अपयशी ठरला.परंतु वेळीच ही घटना समोर आली नसती तर मोठा अपघात घडून जीवितहानी ची शक्यता होती.

या घटनेतील ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांना अखेर सोडून देण्यात आले.अखेर 48 तासानंतर ही आरोपींना शोधून काढण्यात अपयश आले आहे.