धक्कादायक खून :क्षुल्लक कारणावरून M.B.B.S. च्या विदयार्थ्याचा खून करणारे आरोपी गजाआड , ४८ तासाचे आत उघड

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दिनांक १०/११/२०२१ रोजी २०.३० वाजता श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकोय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथेM.B.B.S. च्या अंतीम वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अशोक सुरंद पाल वय २४ वर्ष रा. मेडीकल कॅम्पस, यवतमाळ याचा श्री.वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ परिसरातील महिला वसतीगृहाजवळ झालेल्या निर्घृण खुनाच्या घटनेने संपूर्ण वैदयकीय क्षेत्र हादरून गेले तसेच जनमानस स्तब्ध झाले होते. सदर घटनेची माहिती पोस्टे यवतमाळ शहर येथे प्राप्त होताच ठाणेदार यवतमाळ शहर पोस्टे व त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक स्थागुशा, प्रभारी अधिकारी, सायबर सेल, वणेदार अवधुतवाडी पोस्टे, वणेदार लोहारा पोस्टे, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवित घटनास्थळ सुरक्षित व संरक्षित केले. श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय यवतमाळ येथील पदवी व पदयूत्तर अभ्याक्रमातील विद्यार्थ्यांनी अपघात विभागाच्या बाहेर एकत्रित जमा होऊन मयत विद्यार्थी अशोक सुरेंद्र पाल याच्या खुनाच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर निदर्शने व घोषणबाजी सुरु केली. महाविदयालय परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण होऊन कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झाली. पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी सर्व शोकाकूल विदयार्थ्यांना ध्वनीक्षेपकाव्दारे परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. महाविद्यालय परिसरातील महिला वसतीगृहाजवळ दि. ३०.०८.२०२१ रोजी घडलेल्या घटने संदर्भात शासकीय रुग्णालय पोलीस चौकी येथे झालेल्या समेट/समझोता बाबत पोलीस स्टेशन यवतमाळ शहर पोस्टे येथे स्टेशन डायरी येथे करण्यात आलेल्या नोंदीबाबत त्यांना अवगत करण्यात आले.

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथील अधीक्षक व जनसंपर्क अधिकारी डॉ. सुरेंद्रअजाबराव भुवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवतमाळ शहर पोस्टे. गु.र.नं.८२४/२०२१ भादवि कलम ३०२,३४ सहकलम भा. ह. कायदा कलम४/२५ प्रमाणे १) आकाश दिलीप गोफण वय २१ वर्ष २) तुषार शंकर नागदेवते वय २४ वर्ष रा. वाघापूर यवतमाळ व त्यांचे साथीदाराविरुद्ध दि.११.११.२०२१ रोजी ०३.४७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील दोन्ही संशयीत आरोपीना तात्काळ अटक करण्यात आली.मा. न्यायालयाकडून त्यांची दि. १७.११.२०२९ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.वैदयकीय क्षेत्र हादरून सोडणा-या MBBS अंतीम वर्षांच्या विदयाव्यांच्या खुनाच्या घटनेचा तपास अत्यंत क्लिष्ट गुंतागुंतीचा व आव्हानात्मक असल्याने सदर गुन्हयाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे नेतृत्वाखाली यवतमाळ शहर पोस्टे. अवचुतवाडी पोस्टे, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल अशी एकूण ६ पथके तयार करण्यात आली. सदर पथकांनी मयत, संशयीत आरोपी यांचे संदर्भात सखोल माहिती प्राप्त केली. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी महाविदयालयातील मित्र मैत्रिणी, प्रेम संबंध, आंतरीक व बाहय वाद झगडे, भांडणे याबाबत -महाविद्यालय परिसरात व इतरत्र गोपनीय माहिती काढण्यासाठी जवळपास १०० च्यावर खबरी नेमण्यात आले. सदर पथकातील सर्व अधिकारी, – पोलीस अंमलदार यांनी गोळा करण्यात आलेल्या माहितीचे अत्यंत काळजीपूर्वक विश्लेषण व पृथकरण करून गुन्हयाची उकल करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तपासामध्ये निष्पन्न झालेल्या माहितीची सांगड सिडीआर, एसडीआर, डम्पडाडा अॅनालिसीस इ. तांत्रिक विश्लेषणाव्दारे त्यावर शिक्कामोर्तब करून गुन्हयातील आरोपीविरुद्ध सवल पुरावा निष्पन्न करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.

पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी सदर गुन्हयाचे तपास कामी नेमलेल्या ६ पथकांनी गोळा केलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे यवतमाळ शहरातील १) ऋषीकेश गुलाबराव सवळे वय २३ वर्ष रा महाविर नगर, यवतमाळ, २) प्रविण संजीव गुंडजवार वय २४ वर्ष सावित्रीबाई फुले सोसायटी, यवतमाळ व एक विधीसंघर्धग्रस्त बालक दांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी खुनाच्या गुन्हयाची कबुली दिली आहे. घटना तारीख वेळी व ठिकाणी सदरचे तिन्ही मोटार सायकल वरुन जात असतांना मयत अशोक पाल यास धक्का लागल्याचे कारणांवरुन त्यांच्यामध्ये शाब्दीक वादातून भांडण झाले. त्यामध्ये आरोपीतांनी मयतास चाकूने छातीवर व पोटाचे खाली दोन ठिकाणी घाव करुन घटनास्थळावरून पळून गेले. सदर आरोपीतांकडून गुन्हयात वापरलेले हत्यार व मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही डॉ. दिलीप पाटील-भुजवळ, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, डॉ. के ए. धरणे, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्यानेतृत्वाखाली प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक, स्थागुशा, यवतमाळ, पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत, यवतमाळ शहर पोस्ट सपोनि अमोल पुरी,सायबर सेल सपोनि गणेश वनारे, सपोनि, विवेक देशमुख, स्थागुशा, सपॉनि खंडेराव, यवतमाळ शहर पोस्टे पोउपनि योगेश रंथे पोहवा बंडू डांगे, नापोशि निलेश राठोड, नापोसि बबलु चव्हाण, पोशि सलमान शेख, पोशि किशोर अॅडकर, सर्व स्थागुशा यवतमाळ पोना सुमित पाळेकर, पोशि अजय निर्वाोळकर, मर्पोश रोशनी जोगळेकर सायबर सेल पोहवा गजानन शिरसागर, पोशि अमित कदम, पोशि मिलींद दरेकर, पोशि निलेश घुसे, पोना अलताफ शेख, यवतमाळ शहर पोस्टे वांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील उपरोक्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी रु. १,००,०००/- रोख व GST/C-NOTE असे प्रोत्साहनपर बक्षिस जाहीर केले आहे.