शेतकरी मिशन चे अध्यक्ष किशोरभाऊ तिवारी यांच्यासमोर जितेंद्र कहुरके यांनी धानोरा गावातील समस्यांचा वाचला पाढा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

शेतमजुरांना अधिकृत शासनाचे पट्टी नसल्यामुळे शेतमजूर घरकुल पासून वंचित रहात आहे तसेच धानोरा पशुवैद्यकीय दवाखान्याला कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे पशुपालकांचे होत आहे हाल तसेच राळेगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा होत नाही तसेच धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील असंख्य कर्मचारी हे मुख्यालयी राहत नाही कर्जमाफीत नाव आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाही या सर्व समस्या नायब तहसीलदार बदकी साहेब गटविकास अधिकारी मडावी साहेब मंडळ अधिकारी निनावे साहेब गामसेवक खडसे साहेब तालुका कृषी अधिकारी तलाठी यांच्यासमोर सांगितल्या शेतकरी मिशन चे अध्यक्ष किशोरभाऊ तिवारी यांनी नायब तहसीलदार गटविकास अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांना या समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले.