आपले सरकार सेवा केंद्र ASSK नामक कंपनी मानधन वेळेवर न देता 10 महिन्या पर्यंत स्वत वापरते?,ग्राम पंचायत संगणक परिचालक यांचे मानधन कुणाच्या खिश्यात

आपले सरकार सेवा केंद्र ASSK नामक कंपनी च्या माध्यमातून महाराष्ट्र भर संगणक परिचालक हे ग्राम पंचायत मध्ये नागरिक यांना दाखले तसेच अनैक सुविधा पुरवत असतात
सदरील संगणक परिचालक यांचे मानधन ग्राम पंचायत कार्यालय कडून काम पूर्व म्हणजेच एका वर्षा अगोदरच कंपनी घेत असते
पण सदरील कंपनी काही कारणे दाखवत संगणक परिचालक यांना वेळेवर मानधन करत नाही
किनवट तालुक्यातील बोथ येथील संगणक परिचालक यांना जानेवारी 2021
मार्च 2021
जून 2021
नोव्हेम्बर 2021
डिसेंबर 2021 बोथ येथील संगणक परिचालक यांना
असे पाच महिन्याचे मानधन अजून मिळालेले नाहीत कंपनी कडे इतकेच मानधन नसून 2020 मधील सुमारे 8 महिन्याचे मानधन शिल्लक असल्याचे संगणक परिचालक यांनी सांगितले त्यांच्या मते काही विनाकारण अटी दाखवून अंदाजे 1 लक्ष रुपये इतके त्यांचे मानधन जे की ग्राम पंचायत ने कंपनी ला दिलेले असून कंपनी फुकट वापरत आहे सदरील विषयाची सखोल चौकशी झाली तर मोठे आधीकारी आणि नेते मंडळी देखील या कंपनीला सहकार्य करत असल्याचे दिसून येईल आणि सदरील विषयात वेळ आली तर न्याय पालिकेत जाण्यास तयार असल्याचे संगणक परीचाल यांनी सांगितले आहे