१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड , विनयभंगा सह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल


आरोपी अटक करून न्यायालयीन कोठडीत रवाना
एक दिवस पाणी फिल्टर दूकानासमोर थांबवून नाव काय व कोणत्या वर्गात शिकते असे विचारले असता मुलीने नाव व वर्ग सांगितले. आरोपी मुलगा एकनाथ बेसरकर वय २४ रा बोर्डा याने माझ्या सोबत रिलेशनशिप ठेव नाहीतर आत्महत्या करतो अशी धमकी दिली. व स्वतःचे नाव सांगितले व निघून गेला. ५ मार्चला मुलीची शाळा सकाळी असल्याने ७ वाजता शाळेत गेली. घरी परत येताना सदर मुलीच्या मागे वाईट उदेशाने पाठलाग करीत घरापर्यंत आला. व थांब म्हणून आवाज दिला. न थांबता घाबरून मुलगी घरी गेली व घडलेली हकीकत आपल्या आईला सांगितली. ११ मार्च रोजी मुलगी सकाळी शाळेत परत आली व आपल्या आई वडील व कुटुंबियांसोबत असताना ३ वाजता दरम्यान आरोपी एकनाथ बेसरकर हा घरी येऊन माझी बायको कुठे आहे मी तिला भेटायला आलो असा बोलला . मुलीच्या आईने मुलीला बोलावून हाच मुलगा आहे का तुला त्रास देणारा असे विचारले असता मुलीने हो हाच तो मुलगा म्हणून सांगितले. तेव्हा मुलीच्या आई व आजीने मुलाचे हात पकडून ठेवले व तंटामुक्त अध्यक्ष याना फोनवरून सदर घटना सांगितली. यावरून आरोपी मुलाने मुलीच्या आईला धमकी दिली. तंटामुक्त अध्यक्ष हे मुलीच्या घरी न येता पोलिसांना फोन द्वारे पाचारण करून बोलावले व आरोपी एकनाथ प्रभूदास बेसरकर आला अटक करुन पोलीस स्टेशनला आणले. पीडित मुलींच्या तक्रारीवरून कलम ३५४ (ड ) ५०६ सह कलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान करीत आहे.