
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या राळेगाव तालुक्याचा मध्यबिंदू समजल्या जाणाऱ्या वाढोणाबाजार येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर प्राध्यापक श्री वसंतरावजी पुरके सर व श्री प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या नेतृत्वाखाली अरविंद वाढोणकर यांचे संचालक निवडून आले असून नवनिर्वाचित सचांलकामध्ये अरविंद वाढोणकर, रविंद्र देशमुख, दिनेश ठाकरे, निळकंठ हांडे, अंबादास लालसरे,मधूकर सोनटक्के, गणेश येरणे, रमेश येरणे, विठ्ठल कुमरे,सौ .शेख, श्रीमती मांडवकर मनोहर तुराळे, संतोष जाधव हे निवडून आले असून राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची समजले जाणारे सहकार क्षेत्रात बहुतेक ठिकाणी काॅंग्रेस पक्षाचीचं पकड कायम असून मतदारांनी पुरके सर व प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून गाव पातळीवर अरविंद वाढोणकर यांच्या नेतृत्वाखाली या अविरोध निवडीची प्रक्रिया पार पाडून हा कार्यक्रम पार पडला.
