
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव नगर पंचायत हद्दीत विद्यमान आमदार यांच्या नेतृत्वात झालेल्या सिमेंट रोडचे काम पूर्णत्वास झाले परंतु राळेगाव शहरात लागून असलेल्या इंदिरा महाविद्यालय येथून आज रोजी येत असलेल्या पंधरा ते वीस मुली आपला विद्यालय टाईम संपल्याने घराकडे परत जात असताना कोल्हापूर ते वडकी येथे जात असलेला ट्रक प्लास्टिक पाईप भरून होता त्यामध्ये चालक योगेस विजय भंडारी वय वर्षे 30 वर्षे राहणार नागपूर गाडी क्रमांक एम एच 28 v v 1175 हे वाहन घेऊन वडकी येथे जात होता परंतु दैव तारी त्याला कोण मारी या म्हणीनुसार आज रोजी खूप मोठा अनर्थ राळेगाव शहरात होताहोता थोडक्यात बचावला परंतु राळेगाव शहरात वारंवार होत असलेल्या अपघाताची शृंखला याकडे जाणीवपूर्वक शहरातील लोकप्रतिनिधी कोणी लक्ष देण्यास तयार नाही तरी इंदिरा महाविद्यालय यांच्या वतीने तसेच राळेगाव येथील जनतेच्या वतीने शहरात जागोजागी ब्रेकर ची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी होत आहे कृपया याकडे विद्यमान लोकप्रतिनिधी लक्ष देतील का ? असा सूर जनतेतून ऐकण्यात येत आहे गेल्या दिवाळीपासून राळेगाव किमान आठ ते नऊ मृत्यू अपघात झालेले आहे तरीपण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे आज रोजी सुदैवाने खूप मोठा अनर्थ डायवर त्यांच्या समय सुचते नुसार स्वतः गाडी खड्ड्यात घातली नसती तर शाळेच्या मुलींचा जीव आज रोजी धोक्यात होता याकडे कृपया लोकप्रतिनिधीने लक्ष द्यावे अशी जनतेतून मागणी होत आहे.
