रावेरी भांब एकबूर्जी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत प्रफुल्ल मानकर गटाच्या राजेंद्र तेलंगे गटाकडून भाजप सेनेचे पाणीपत

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

रावेरी हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे समजले जात असून या गावात वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळे पद भुषविणारे,भुषवित असलेले पदाधिकारी असून सोबतच या गावात हनुमानजीचे मंदिर असल्यामुळे कुठल्याही निवडणूकीचा नारळ फोडून शुभारंभ सुद्धा केला जातो.त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक पक्षातील तालुका स्तरावरील नेत्यांनी या सोसायटीत अप्रत्यक्षपणे लक्ष केंद्रित केले होते.तर या निवडणुकीत भाजपा सेना विरूद्ध प्रफुल्ल मानकरांचा कांग्रेस समर्पित गट ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूकीच्या माध्यमातून आमने-सामने तयार झाला होता.गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक प्रक्रियेपासून तर निवडणूक पार पडेपर्यंत तिन्ही गावातील कार्यकर्ते प्रचाराला लागले होते.हा हा म्हणता म्हणता 14/6/2022 तारीख आली आणि मतदानाला सुरुवात झाली.मतदान पार पडले मतमोजणी पूर्ण झाली आणि अवाक् होणारा निकाल हाती आला.जिकडे तिकडे हाहांकार माजला कि राजेंद्र तेलंगे यांच्या तेराही सिटा मोठ्या फरकाने निवडून आल्या विशेष म्हणजे या गटाचे मुख्य श्री राजेंद्र तेलंगे यांनी सर्वांत जास्त मते मिळवून मतदारांचे असलेले प्रेम दाखवून दिले. या निवडणुकीत अनेक तालुकास्तरीय नेते मी म्हणून उभे होते परंतु त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला.आणि यामध्ये भाजपा सेना सत्तेपासून दूर गेली आणि परत कांग्रेस समर्पित प्रफुल्ल मानकर गटाचे तेराही उमेदवार निवडून आले.त्यामध्ये कर्जदार गटातून सर्वस्वी राजेंद्र वामनराव तेलंगे, दुर्गेश सुर्यभानजी शिवणकर, जयवंत शेखरराव झाडे, विनोद नामदेवराव कुबडे, सतिश शेषराव कोरडे, गजेंद्र उद्धवराव चौधरी, गजानन जनार्दन झाडे,

पंजाबराव चंद्रभान हिवरकर,तर अनुसूचित जाती जमाती या गटातून नारायण विठोबा मडावी,तर विमुक्त जाती भटक्या जमाती या गटातून रमेश विठोबा शिवरकर तर ईतर मागास प्रवर्ग या गटातून विजय देवराव पिंपरे, तर महिला राखीव गटातून सौ.चंदा वासुदेव धोटे व सौ.निता राजेश भुडे हे उमेदवार भरपूर मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत काही तालुकास्तरीय नेत्यांनी आपली जादूची कांडी फिरविण्याचा प्रयत्न केला परंतु प्रफुल्लभाऊंच्या राजकीय खेळीमुळे ते अयशस्वी ठरले.या झालेल्या निवडणुकीत तिन्ही गावातील सर्वस्वी तानबाजी कुरटकर,रमेशराव चंदनखेडे, नामदेवराव कुरटकर,पांडुरगजी रोहणकर,गजानन झोटींग, नरेशराव पाल , दिपकराव सातपुते , देविदास खेकारे , अनिल कुरटकर, अरविंद निखाडे ,मोरेश्वर डाखोरे, देविदासजी हिवरकर, शेखरराव झाडे, अनंतराव झाडे,जनकराव आडे अभिषेक उत्तरवार ,राजू चिंचोळकर राजू शिवणकर, विलास खुडसंगे, निलेश शेलवटे, योगेश कुटे, किशोर आत्राम, सह अनेक कार्यकर्त्यांनी यांनी अथक परिश्रम घेतले.