शेतात वीज पडून 2 मुली व 2 महिलांचा मृत्यू

वरोरा तालुक्यातील चारगाव जवळ असलेल्या वायगाव भोयर येथे आज दुपारी तीन च्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाल्याने झाडाचा आसरा घेत थांबून असताना वीज कोसळल्याने 2 महिला व 2 मुलींचा जागीच मृत्यू झाला .
मृतांमध्ये 1) हिरावती शालीक झाडे वय वर्ष 45 ,वायगाव भोयर ,माजी पंचायत समिती सदस्य वरोरा
2)पार्वता रमेश झाडे वय वर्ष 60 रा.वायगाव
3) मधुमती सुरेश झाडे वय वर्ष 20 रा.वायगाव
4)रिना नामदेव गजभे वय वर्ष 20 रा.वायगाव
यांचा जागीच मृत्यु झाला. वायगाव भोयर येथील मृत असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.या घटनेनंतर शेमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या शेतकरी कुटुंबियांना पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहे.
या घटनेची माहिती शेगाव पोलीस स्टेशन ला दिली असता ठाणेदार अविनाश टेकाम यांच्या मार्गदर्शनात पंचनामा पी एस आय जाधव ,श्री. किशोर पिरके ,श्री. महादेव सरोदे करीत आहे.