पंचायत समिती येथे स्वातंत्र्य दिनी पुरस्काराचे वितरण

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त पंचायत समितीमध्ये रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,प्रश्न मंजुषा,गायन स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा आदी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत ज्या स्पर्धकांनी स्पर्धेत अनुक्रमे गुण प्राप्त केली अशा स्पर्धकांना स्वातंत्र्यदिनी व पुरस्काराचे वितरण गटविकास अधिकारी केशव पवार, साह्ययक गटविकास अधिकारी मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर पंचायत समिती कार्यालयात महिला बचत गट मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. तसेच तालुक्यातील महाआवस योजनेमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या लाभार्थ्यांना गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार वाटप करण्यात आले असनु त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी कार्यक्रमाला पंचायत समीतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.