सेल्फी काढायला गेलेले मित्र धरणात बुडाले

,

निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेल्या वरोरा तालुक्यातील चारगाव येथे धरणाचे विलोभनीय दृष्य पाहायला गेलेल्या मित्रातील दोघे धरणातील पाण्यात बुडाल्याची घटना घडली .तालुक्यातील चारगाव धरण येथे आश्रय गोलगोंडे,मयूर पारखी,श्वेत जयस्वाल , आयुष चिडे ,हार्दिक गुळघाणे हे सर्व मित्र चारगावव धरण येथे भरगच्च भरलेल्या धरणावर आनंद घेण्यासाठी गेले असता हार्दिक गुळघाणे हा सेल्फी घेत असताना तोल गेल्याने पाय घसरून तो पाण्यात पडला त्याला वाचवण्यासाठी आयुष चिडे याने पाण्यात उडी घेतली .मात्र हे दोघेही मित्र धरणात बुडाल्याने अन्य मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली .स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला असतांना त्यांना यश आले नाही .त्यामुळेजिल्हा प्रशासनाचे बचाव पथकाला चारगाव येथे प्राचारण करण्यात आले असून बचाव पथक दोघांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.स्थानिक शेगाव पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.