
ढाणकीतील नशेली शिंदी विक्री बंद करा.ठाणेदार भोस यांना निवेदनातून मागणी.
ढाणकी-प्रतिनिधी प्रवीण जोशी.
नैराशाच्या गर्तेत सापडलेला युवक ,गांजा,देशी,विदेशी व हातभट्टी सारख्या नशेचे सेवन करून आपले जिवन बरबाद करत आहे.आता ढाणकीत गोळया मिश्रीत शिंदी ने शीरकाव केला असून अनेक तरूण शिंदीची नशा करतांना दिसून येतात, ज्यांच्या ओठावर मिशी देखील आली नाही,अशी तरूण पिढी व्यसनाधिनकडे वळत असल्याने त्यांचे आयुष्य धोक्यात आहे.अमाप पैसे कमविण्याच्या नादात तरूणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शिंदी माफीयांच्या मुसक्या आवळण्याची विनंती एका निवेदना व्दारे ठाणेदार प्रताप भोस यांना केली आहे.
कृष्णापुर,सोईट तसेच टेंभेश्वर नगरातील युवकांना शिंदी विक्रेत्यांने लक्ष केेले असून त्यामध्ये शाळकरी मुले देखील त्यांच्या गळाला लागली आहे.शिक्षणासाठी व इतर कामासाठी दिलेल्या पैशाचा दुरपयोग नशेची लत भागविण्यासाठी हे तरूण वर्ग करत आहे.नशेच्या गोळयांनी अनेक तरूणांच्या आरोग्य व मानसिकतेवर दुरगामी परीणाम होत असून मनोरूग्णा सारखे विकार त्यांना झडत असल्याचे प्रकार उघडकीस येत असल्याचे निवेदनात शेख तैयब शेख अहेमद,सैयद खालीद सैयद जिलाणी यांनी म्हटले आहे.
त्यांनी असेही नमुद केले आहे की,जर ठाणेदार प्रताप भोस यांनी वेळीच शिंदी विक्रेत्यांना पायबंद आणि मुसक्या आवळल्या नाही तर ढाणकी च्या तरूणाची अख्खी पिढीच्या पिढीच बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही असेही निवेदणात नमुद केले आहे.
शिंदी विक्रेता हा उमरखेड वरून प्लास्टीकच्या पिशवी मध्ये भरून ढाणकीतील काही स्थानिक लोकांना हाताशी घेऊन नशेली शिंदी विकतो.ढाणकी व ढाणकी परीसरात त्याने आपले जाळे एवढे पसरविले आहे की एका दिवसात 10 हजार रू ची शिंदी विक्री करतो आणि त्यामधून अमाप पैसा मिळवितो.पैसा कमविण्याच्या धुंदीत तो तरूण पिढीला बरबाद करण्याचा जणू काही विडाच उचललेला आहे.
गणेशा उत्सहाच्या कालावधीत तो मोठया प्रमाणात शिंदी चा ढाणकी सारख्या शहरात पुरविण्यासाठी शिंदी विक्रेत्याची टोळी सक्रीय झाली आहे.ठाणेदार प्रताप भोस यांची शिंदी विक्रेत्यावर बारकाईची नजर असून पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर असल्याचे बोलल्या जाते.
चौकट – बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कोणी शिंदी विकतांना किंवा पितांना आढळल्यास त्याच्यावर कठोरात कठोर व ठोस कारवाई करण्यात येईल व तरुण पिढी हीच देशाची संपत्ती आहे याची जाण ठेऊन अशा अवैध शिंदी विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
कर्तव्यदक्ष, ठाणेदार .. प्रताप जी भोस
