कारंजा येथे कांशीराम यांचा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न

कारंजा (घा):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन समिती कारंजा (घा), बुद्धिस्ट एम्पलॉइज वेल्फेअर असोसिएशन कारंजा (घा), तसेच त्रीरत्न बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा (घा) जि. वर्धा येथे दिनांक 9 ऑक्टोबर 2022 ला मान्यवर कांशीराम यांना स्मृतिदिना निमित्त श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.पी. गाडगे,प्रमुख पाहुणे कारंजा नागरी संघर्ष समितीचे विनोद चाफले तसेच बहुजन समाज पार्टीचे विधानसभा प्रभारी लक्ष्मण वाळके ,भारतीय बौद्ध महासभेचे राजेश दहिवडे
विनोद पाटील विचार मंचावर उपस्थित होते.विचार मंचावरील सर्व उपस्थितांनी मान्यवर कांशीराम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे कार्यवाह अशोक नागले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .प्रास्ताविक लक्ष्मण वाळके यांनी केले तर आभार दिपक बागडे यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनमाला माहुरे, पियुष रेवतकर, नीरज माहुरे ,नथूजी देशभ्रतार, गोवर्धन पाटील यांनी सहकार्य केले. शेवटी कोजागिरी पौर्णिमा तसेच वर्षावास समाप्ती प्रित्यर्थ वनमाला माहुरे यांच्यातर्फे उपस्थितांना खीर वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.