
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पळसकुंड, उमरविहीर गट ग्रामपंचायत येथिल महिलांचे वडकी पोलीस स्टेशनला निवेदन सविस्तर वृत्त असे पळसकुंड, उमरविहीर येथिल सरपंच वनिष घोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पळसकुंड उमरविहीर येथिल महिलांनी दारू दुकाने बंद करण्याबाबतचे निवेदन वडकी पोलीस स्टेशनला दिले आहे.सदर आम्ही पळसकुंड उमरविहीर येथिल रहिवासी असून आपणास विनंती पुर्वक लेखी तक्रार सादर करतो की पळसकुंड उमरविहीर येथिल हातभट्टी दारू व देशी दारू छुप्या पध्दतीने विक्री सुरू आहे. हे अवैध दारू बंद करून महिलांना होत असलेला त्रास कमी करावा कारण या अवैध दारू विक्री मुळे येथिल महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. व याचा मात्र त्रास घरगुती वातावरणात होत आहे तर शाळेत शिकत असलेल्या मुलांना सुध्दा होत आहे सदर येथिल हातभट्टी दारू ही पावडर युक्त असुन या दारू मुळे अनेक लोकांना गंभीर बीमाऱ्या सुध्दा झालेल्या आहेत तर काही लोकांनी दारूच्या नशेत विष प्राशन करून आत्महत्या सुध्दा केलेल्या आहे. व आज रोजी त्यांचे कुटुंब उघडल्यावर आलेले आहे सदर या बाबींकडे ताबडतोब लक्ष देवून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करुन आम्हाला व आमच्या मुलाबाळांना या त्रासापासून मुक्त करावे. सदर संबंधित दारू विक्रेत्यांवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास आम्ही गावातील सर्व महिला उपोषणाला बसु असे या निवेदनात नमूद केले आहे. सदर हे निवेदन पळसकुंड उमरविहीर येथिल कर्तव्यदक्ष सरपंच वनिष घोसले व उपसरपंच सुभाषराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांना देण्यात आले आहे.
