
वरोरा शहरातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथून एकार्जुना येथील रहिवासी दादाजी मारोतो दरेकर यांनी एकूण 50 हजार रुपये काढले .त्यातील 5 हजार उर्वरीत खर्चासाठी वेगळे काढून ठेवले व 45 हजार व खाते बुक एका पिशवीत ठेवून जात असताना मागून स्कुटीवर आलेल्या तोंडाला रुमाल बांधून एका इसमाने ती बॅग पळवली व भर वेगात तिथून पळ काढला. या घटनेनंतर वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसानी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.गुप्त माहितीच्या आधारावर एका ला ताब्यात घेण्यात आले.खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीकडून एक गाडी,पैसे ,चाकू ,मोबाइल असा एकूण 1 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
