कंत्राटदारावर कारवाई करा अन्यथा आमरण उपोषणाची परवानगी द्या: पीडित कामगारांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत वरोरा शहरातील साफसफाई चे संपूर्ण काम के.जी. एन कॅटर्स अँड ट्रेडर्स यांना 2018 पासून मुख्याधिकारी वरोरा यांच्याकडून देण्यात आले आहे.त्यानुसार वरोरा शहरातील कामगार त्यांच्या कामावर काम करत होतो .सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार पगार न देता अत्यल्प पगारात कामगारांना राबवून घेण्यात येत होते.कामगारांना ई पी एफ,इ सी आर इ आय सी तसेच कामावर कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या बँक खात्यात पैसे जमा न करता कामगारांना अत्यल्प मजुरी देत काम करवून घेण्यात येत होते. कर्मचाऱ्यांचे वेतन खात्यात जमा करण्यासकरिता प्रत्यक्ष काम न करणाऱ्या खोट्या कामगारांचे इ सी आर ,आय सी व इ पी एफ मध्ये खोट्या कामगारांची चालाण प्रत बिलासोबत जोडून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करून भारतीय दंडसाहिता 1860 मधील कलम 420 नुसार शासनाची तसेच कामगारांची फसवणूक करून शासनाचे व कामगारांचे लाखो रूपयांचा अपहार केला आहे.संबंधित अधिकारी व संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कामगारांना न्याय द्यावा किंवा कामगारांना आमरण उपोषणाची परवानगी देण्याची विनंती कामगारांनी केली आहे.