कोपरी गाव राबविणार एक घर एक उत्सव गजानन महाराज प्रगटदिनापासून उपक्रम , सरपंच प्रवीण नरडवार यांचा पुढाकार

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील कोपरी या गावातील दिं १३ फेब्रुवारी २०२३ सोमवारला गजानन महाराज प्रगटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या प्रगट दिनाला उपस्थित प्रा.माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके हे होते यावेळी प्रगटदीना निमित्य बोलतांना पुरके म्हणाले की आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहत असून देशात शांतता व एकोपा टिकून राहावी यासाठी गावातील सर्वांनी मिळून एकत्रित सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यानंतर गावात असलेल्या गजानन महाराज प्रगटदीना पासून सरपंच यांनी लोकांसमोर आपले विचार मांडून एक घर एक उत्सव राबविण्याकरिता कोपरी येथील गावकऱ्यांना समाजवून सांगितले त्यानंतर त्यांच्या विचारला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत यापुढे गावातील कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल तर आम्ही सर्व समाज बांधव एकत्रित येवून एक घर एक उत्सव राबविणार असल्याचे गावकऱ्यांच्या पुढाकाराने ठरविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कोपरी या गावात एक घर एक उत्सव राबविण्याचा हा पहिलाच उपक्रम असावा.गावागावात
दिवसेंदिवस समाजा समाजात जातीयतेची तेढ निर्माण होत चालली असून अशांतता पसरली आहे. गावागावात प्रत्येक जाती धर्माचे लोक आहेत ते आपापल्या धर्मांचे कार्यक्रम वेगवेगळे करतात अशावेळी समाजा समाजात तेढ निर्माण होवू नये म्हणून आमच्या गावात एक घर एक उत्सव राबविण्याचा संकल्प केला असून गावात एकोपा व एकजूट टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने सर्व लोकांनी जात पात धर्म बाजूला सारून संतांची व थोर महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी एकत्रित येऊन साजरे करून गाव किंवा तालुका नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या गावाच्या एकजुटीचा परिचय आपण करून देऊ व गाव स्वच्छतेच्या दृष्टीने दर रविवारला ग्राम स्वच्छता मोहीम राबविणार तसेच ग्रामपंचायत येथील विविध योजनांबद्दल माहिती त्याचप्रमाणे ग्रामसभेला देखील गावकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच प्रवीण नरडवार यांनी केले.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक वामन पराते, हरिभाऊ उल्लेवार, अनिल पुनवटकर,शंकर पराते ,शेषरावजी निकुडे, सरपंच प्रवीण नरडवार यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    *प्रतिक्रिया*

गावागावात जर एक घर एक उत्सव राबविला तर गावागावातील नागरिकांमधील मतभेद दूर होवून शांतता नांदेल व गावात एकोपा व एकजूट टिकून राहील व समजा समाजातील वाद विवाद होणार नाहीत त्यासाठी मी पुढाकार घेऊन कोपरी या गावातील एक घर एक उत्सव राबविण्याचे गावकऱ्यांना समजून सांगितले आणि गजानन प्रकट दिनापासून गावात एक घर एक उत्सव सुरू केला आहे.

   *सरपंच*

प्रवीण नरडवार
गट ग्राम पंचायात कोपरी वालधूर ता.राळेगाव जि.यवतमाळ