
लोकहित महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव उमरखेड.
उमरखेड तालुक्यामधील विडूळ येथील प्रकरण रोजगार सेवकांच्या आडमुठेपणामुळे, गरीब घरकुल योजने पासून वंचित ठेवले. फ वरिष्ठांकडे कागदपत्रे न पाठवता जाणीवपूर्वक घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. रवी दवणे रोजगार सेवक यांनी विडूळ येथील एका विधवा गरीब महिलेची फाईल जळून ठेवली असा आरोप विधवा महिलेने केला आहे.
फाईल अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलीच नाही जाणून बुजून अचानक एकदाच गावकऱ्यांनी गोंधळ उडविला, सचिवांनी गावामध्ये रजिस्टर फिरवून टॅक्स भरल्याशिवाय एकही घरकुल मिळणार नाही, अशी धमकी दिली .
तसेच आवडत्या व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. आक्रमक भूमिका घेऊन त्या रोजगार सेवक व भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कार्यवाही व्हावी ,अशी मागणी केली व लोकांना न्याय मिळावा अशी विनंती केली.एकंदरीत विडुळ गावामध्ये 325 लोकांच्या घरकुलाच्या फाईली आहेत .रोजगार सेवकांनी जाणीवपूर्वक या कागदपत्रांना पुढे न पाठविल्याने खरे लाभार्थी घरकुलपासून वंचित राहिल्याचे चित्र आहे.
