उमरखेड उप जिल्हा रुग्णालयाचे काम रखडलेलेच,त्वरित काम पूर्ण करण्यासाठी हेल्प फौंडेशन तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी. जाधव

हेल्प फौंउडेशन यवतमाळ चे पदाधिकारी भाविक भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालय उमरखेड चे काम का थांबले असं निवेदन केलं. इमारतीचे काम पूर्ण झाले परंतु त्यामधील असलेले साहित्य व डॉक्टर्स नर्स ब्लड बँक अशा सुविधा लोकांना मिळत नाही एकांदी डिलिव्हरी इमर्जन्सी केसेस, एक्सीडेंट केसेस, सर्प दंश झालेली केसेस त्यांना तात्काळ ऍडमिट करायचा असेल तर कुठे करावे. अशी कळकळ भाविक भगत यांनी आज उमरखेड येथे केली. आज उमरखेड या शहराभोवती ग्रामीण विभागात रस्ते खराब असल्याकारणाने पेशंट दवाखान्यापर्यंत येऊ शकत नाही. व आला तरी त्यांना सुविधा उपलब्ध होत नाही. कारण इथे मशनरी नाहीत, ब्लड बँक उपलब्ध नाही, डॉक्टर्स नसतात, नर्स नसतात, अशा अनेक अडचणीला रोगी यांना समोर जावे लागते. व मृत्यूला बळी पडावे लागते याला कारणीभूत कोण आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी यांचे निवेदन स्वीकार करून, तात्काळ रुग्णालयात सर्व साहित्य डॉक्टर्स नर्स उपलब्ध करून द्यावे ही कळकळीची विनंती.