
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव येथील पंचायत समिती मधील विद्युत वितरण कंपनीच्या अमरावती येथील पथकांनी विद्युत मीटरची तपासणी केली असता दिं २४ मार्च २०२३ रोज शुक्रवारला विद्युत पुरवठा खंडित केला असल्याने येथील कार्यालयीन कामकाज ठप्प पडले आहे.
पंचायत समिती येथील विद्युत मीटर हे पूर्वी जुन्या इमारतीत होते त्यावेळी येथील बिल हे नियमित भरल्या जात होते मात्र पंचायत समितीची इमारत नवीन झाल्यापासून जुन्या इमारतीतील मीटर काढून नवीन इमारतीत लावण्यात आले परंतु विद्युत वितरण कंपनीने आजपर्यंत पंचायत समिती कार्यालयातील बिल हे सरासरी देत १२००० ते १३००० रुपये देत असल्याने नियमित भरल्या गेले मात्र आज अमरावती येथील विद्युत वितरण कंपनीच्या पथकाने विद्युत मीटरची तपासणी केली असता असलेली रिडींग नुसार थकीत रक्कम तीन लाख चाळीस हजार रुपये एवढे एवरेज बिल काढले असून एवढ्या बिलाची रक्कम पंचायत समितीने न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून आज दिवसभर पंचायत समिती कार्यालयातील कांमकाज ठप्प पडले होते.