जय श्रीराम गजरा ने दुमदुमले शहर, आकर्षक शोभायात्रा ठरली नेत्रदीपक

सहसंपादक -रामभाऊ भोयर

श्रीराम नवमी उत्सव समिती च्या वतीने श्रीराम नवमी उत्सवसाजरा करण्यात आला आकर्षक झाकी कवायती करणाऱ्या मुली ते ठीक ठिकाणच्या दिंड्या रांगोळी स्पर्धा प्रश्नमंजुषा महाप्रसाद यामुळे राळेगाव शहरात संपूर्ण वातावरण श्रीराममय झाले होते सकाळी नऊच्या सुमारास बाईक रॅली काढण्यात आली सायंकाळी रांगोळी दिवे नी शहर सजले होते शहराच्या मुख्य भागातून शोभायात्रा काढण्यात आली प्रभू श्री रामचंद्राच्या जीवनावर आधारित शोभायात्रा हे आकर्षण होते श्रीराम पालखीचे पूजन आमदार डॉ अशोक उईके नगराध्यक्ष रवी शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी अर्बन बँकेचे संचालक ॲड प्रफुल्ल चव्हाण सुरेश सिंह गहर वाल, कार्याध्यक्ष गोपाल मशरू श्रीराम देवस्थानचे अध्यक्ष डॉ अनिल वर्मा सचिव मेघशाम चांदे भूपेंद्र कारिया माजी सभापती प्रशांत तायडे भाजपा शहराध्यक्ष डॉ कुणाल भोयर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले रांगोळी स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील गुणवंतांना सन्मानित करण्यात आले महाप्रसादाने कार्यक्रमाचा सांगता झाली

श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड प्रितेश वर्मा यांनी भव्य, दिव्य शोभायात्रा यशस्वीरीत्या व शांततेत पार पडली करीता सर्वांच्या सहभागाकरीता समस्त जनतेचे अभिनंदन केले, श्रीराम नवमी उत्सव समिती चे सर्व सदस्य, पदाधिकारी, गावकरी, वर्गणी दाते, मंदिर समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वहिनी, मातृ शक्ती, सर्व राजकीय संघटना, व समस्त सहकार्य, साथ व सहभागी झालेल्या सर्वांचे खुप खुप अभिनंदन केले.