
सहसंपादक:रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील जिल्हा परिषद शाळेला टीन पत्र्याचे छप्पर एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दिले उभारून. सविस्तर वृत्त असे रिधोरा येथील सरपंच उमेश गौऊळकार यांच्या पुढाकाराने सफेक्स केमिकल इंडिया लिमिटेड या कंपनी द्वारा सी एस आर. अंतर्गत जिल्हा परिषद शाळा रिधोरा येथील एका संगणक कक्षा वरील खोलीला चक्क टीन पत्र्याचे छप्पर उभारून दिल्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांनी या कंपनीचे व सरपंच उमेश गोऊळकार यांचे आभार मानले आहे. यावेळी वैभव कृषी केंद्र यवतमाळ (संचालक) सतीश कांडूरवार, मातोश्री कृषी केंद्र राळेगाव (संचालक) गणेश कुटे, जय दुर्गा कृषी केंद्र वडकी (संचालक) उमेश गौऊळकार तसेच सफेक्स केमिकल लिमिटेड इंडियाचे राज्य प्रतिनिधी पवन घोंगरे, जिल्हा प्रतिनिधी दिनेश राठोड यांच्यासह शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
