जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार अभियानांतर्गत विशेष शिबीर आयोजित

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे 9 जुन रोजी शासन आपल्या दारी अभियानांतर्गत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते . शिबिरामध्ये पुरविण्यात येणारी सेवा पी.एम.किसान केवायसी. पी. एम किसान नोंदणी, आधार कार्ड नोंदणी(आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झालेल्या नागरीकांचे आधारला दस्तावेज अद्यावत करणे , 5 वर्षे वयोगटातील बालकांचे आधार नोंदणी इत्यादी कामे ), आयुष्मान भारत गोल्डन कार्ड, आभा कार्ड , श्रम कार्ड 7/12 व आठ अ उतारा – तलाठी, जातीचा दाखला – आपले सरकार सेवा केंद्र चालक, नान क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नवीन शिधापत्रिका, शिधापत्रिकेची दुय्यम प्रत, शिधापत्रिकेतुन नाव कमी करणे, शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, ए पी एल शेतकरी योजना, नैसर्गिक आपत्ती प्राधिकरण, नवीन मतदान कार्ड मतदान कार्ड मधुन नाव वगळणे, मतदान कार्ड दुरुस्ती करणे , मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे ( सेतू सुविधा केंद्र ) मधुन देण्यात येणा-या सर्व सेवांचा प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेगळे टेबल लावुन जसे निवडणूक विभाग, संजय गांधी निराधार योजना विभाग, पशुसंवर्धन विभाग, अन्न पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, महीला बालकल्याण विभाग ,पंचायत विभाग, पी.एम. किसान विभागाच्या टेबलच्या कर्मचा-यांकडे जाऊन अर्ज केला व लाभ घेतला या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी सानप, विस्तार अधिकारी पंचायत मस्के , सरपंच राधाबाई टेकाम, दहेगाव गावाचे तलाठी डुकरे, ग्रामविकास अधिकारी गाणार, मुख्याध्यापक देऊळकर, पोलिस पाटील हरीदास आवारी. तलाठी, सातगे, देवळे , बी एल ओ शेंडे, मांडवकर, कुडमथे, आधार केंद्र चालक राजु मुंडाली, आपले सरकार सेवा केंद्र चालक हर्षल शेंबडे, कोतवाल नरेश सावरकर, रूपेश पेचे, वंदना धनरे, अंगणवाडी सेविका. पुजा गायकवाड, दुर्गा जोगी, दुर्गा मुडे , करिश्मा टेकाम, सहकार्य केले व ग्रामपंचायत लिपिक संतिश पेंदे, कर्मचारी खुशाल खोके, आशा वर्कर. दुर्गा कुबडे, सुरगा येरमे परिश्रम घेतले.