
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
वडकी परिसरामध्ये सोमवार हा दिवस माणुसकीला काळिमा फसणारा दिवस ठरला असून पोलिसांनी या नराधमांला बेड्या ठोकल्या आहे
वडकी पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या बोरी किन्ही शिवारामध्ये अल्पवयीन मतीमंद मुलीवर वयोवृद्ध माणसाकडून अत्याचार केला असून यामुळे परिसरामध्ये काळिमा फासणारी घटना घडली आहे
वडकी परिसरातील बोरी इचोड या गावातील आरोपी बंडू शामराव महाजन वय वर्षे अंदाजे ५५ याने परिसरातीलच किन्ही जवादे येथील अल्पवयीन मतीमंद मुलीला बळजबरीने आपल्या मोटार सायकल वर बसवले त्यानंतर किन्ही बोरी शिवारामध्ये कॅनल च्या रस्त्या जवळील लिंबाच्या झाडाखाली शेतामध्ये निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना घरच्यांना समजताच त्यांनी या नराधमाची तक्रार वडकी पोलीस ठाण्यामध्ये दिली यावरून तपास अधिकारी रामेश्वर वेंजने यांनी तपास करून आरोपी नराधमावर अप नं.३५४ /२०२३ कलम ३७६ (२) ३७६ (आय )३७६ (जे) ३७६ (ऐल )भादवी सहकलम ४, ६ पोकसॊ कायदा २०१२ सहकलम ३(२) ( व्ही ) अ. जा. व. अ. ज. अ. अश्या विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे
