
ढाणकी ( प्रती)प्रवीण जोशी
दिनांक 5 सप्टेंबर मंगळवार रोजी बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे ढाणकी येथील पोलीस चौकीला शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी या कार्यक्रमाला पोलीस व अनेक प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. नागेश महाजन, आनंदराव चंद्रे, कैलास घुगरे, रूपेश भंडारी, अनिल येरावार , शहराचे नगर उपाध्यक्ष जहीर भाई, बाळासाहेब चंद्रे, रामराव गायकवाड,खाजा भाई,सविताताई तोटेवाड , बिटरगाव बू पोलीस स्टेशनचे स.पो.उ.नी.शिवाजी टीपूर्णे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सर्वच उपस्थित मान्यवरांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की कायद्याच्या चाकोरीत राहून अत्यंत आनंदाने व उत्साहाने सर्वच सण साजरे करावे परंतु आपल्याकडून हे उत्सव साजरे करताना कोणतेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी विशेष करून युवक हे देशाची संपती असून त्यांनी व्यसनाच्या आहारी न जाता व्यवसाय करून आर्थिक प्रगती साधावी यातच प्रगती आहे.असे सर्वच मान्यवरांनी सुचविले. व यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजात बन्सोड म्हणाल्या
आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानते आपणही प्रशासनास मदत करावी असे आव्हान केले.तर सध्या सायबर चे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असून याबाबत सर्वांनी सतर्क असायला पाहिजे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे यावेळी आवर्जून सांगितले यावेळी उपस्थित असलेल्या शांतता समितीच्या सदस्यांना ठाणेदार मॅडम यांनी राख्या बांधल्या व त्यांना ओवाळणी म्हणून आलेली 9300व व स्वतः जवळील 5000अशी रक्कम काही दिवसापूर्वी शहरातील महिलेचा खून झाला होता त्यामुळे एक बालक आई विना पोरके झाले होते त्या बालकास ही जमलेली रक्कम ठाणेदार मॅडम यांनी दिली व माणुसकीचे उत्तम दर्शन घडविले हे विशेष
