
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात अवैध दारू विक्रीला उधाण आले असून या दारूमूळे ग्रामीण भागातील तरुण युवक आहारी गेले असून पोळाच्या दिवशी वाटखेड येथील २५ वर्षीय सचिन खुशाल वाघ यांनी दारूचे अति सेवन केल्याने पोळ्याच्या पाडवेला सचिनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोळ्याच्या दिवस असल्यामुळे सचिन ने रात्री भरपूर दारू प्याली व झोपी गेला सकाळी तो जागा का होत नाही आई-वडिलांनी पाहिले त्याची प्रकृती गंभीर होती तेव्हा लगेच सचिनला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे आणले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला कुटुंबातील तो एकटा कामाचा मुलगा होता दरम्यान ही विषारी दारूने सचिनचा मृत्यू विषारी दारूनेच झाला असावा गावातील ही दारूने मृत्यूची पहिलीच घटना नसून ही तिसरी घटना असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
या अवैध विषारी दारूने सचिनचा मृत्यू झाला असल्याने वाटखेड येथील महिला व पुरुष पोलीस स्टेशनला धडकले असून ही अवैध विषारी दारू जवळच्या गोपाल नगर परिसरातून येत असून गावातील तसेच बाहेरून येणारी अवैध दारू विक्री बंद करावी येथील दारू विक्रेत्याला पकडून पोलीस स्टेशनला आणावे जो पर्यंत दारू विक्रेत्याना पोलीस स्टेशन मध्ये आणणार नाहीतो पर्यंत आम्ही पोलीस स्टेशन मधून हलणार नाही असा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला सकाळी ८:०० वाजता दाखल झालेले ग्रामस्थ ११:०० वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या मांडून बसून होते ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी परिस्थितीचे गांभीर लक्षात घेऊन पोलिसांना आरोपींना पकडण्याकरिता वाटखेड गावाकडे पाठविले तेव्हा ग्रामस्थ शांत झाले दरम्यान गावकऱ्यांनी सांगितले की वाटखेड येथील पोलीस पाटलांना गावातील अवैध दारू विक्री बद्दल वारंवार सूचना देऊनही तक्रार करूनही पोलीस पाटील गांभीर्याने घेत नाही…. सचिन वाघ हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून शेती व रोज मजुरी यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा घरातील एकुलता एक तरुण मुलगा विषारी दारू पिल्याने मृत्यू पडल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर पडला आहे.
सनादासुदीच्या दिवसांमध्ये दारू विक्री होऊ नये गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी म्हणून ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी शहरातील लायसन धारक दारूची दुकाने बार सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहतील असा फर्मान काढला होता परंतु लायसनधारक दारू विक्री बंद असली तरी अवैध दारू विक्रेते मात्र अधिक सक्रिय होते त्यामुळेच ही घटना घडली असे बोलले जात आहे.
पोलिसांनी केले खंडन
विषारी दारूमुळे या युवकाचा मृत्यू झाला का असे विचारले असता ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी सांगितले की विषारु दारूमुळे एकच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकत नाही या गावात अनेक लोक दारू पिले असतील तर त्यांचाही मृत्यू झाला असता परंतु या युवकाने दारू सोबत विष प्राशन केले असावे असे समजते या बाबत पीएम रिपोर्ट आल्यानंतर नक्की काय ते सांगत येईल
सचिनचा विषारी दारूनेच मृत्यू झाला असावा अशी शंका केली गावकऱ्यांनी व्यक्त
वाटखेड येथे गोपालनगर वरून विषारी दारू येत असून ही दारू सचिन वाघ यांनी पिली असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तेव्हा दारूबंदी करिता वाटखेड येथील गावकऱ्यांनी सकाळी आठ वाजता राळेगाव पोलीस स्टेशनला वाजेपर्यंत ठिया आंदोलन केले आहे.
