
कोल वॉशरीज प्रशासनाकडून बुधवारी पर्यंत मागितला वेळ
वणी :- नितेश ताजणे प्रतिनिधी
वणी येथून जवळच असलेल्या ब्राह्मणी येथील कोल वॉशरीजमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा या मागणीला घेऊन वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात आज ता. १८ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत कोळसा रोको आंदोलन घेण्यात आले होते. यावर कोल वॉशरीज प्रशासनाकडून बुधवार पर्यंत यावर तोडगा काढायचे आश्वासन दिले आहे.
निळापूर, ब्राह्मणी येथील स्थानिक बेरोजगारांना कामावर घेण्यासाठी मागील ४ महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून कोळसा रोको आंदोलन घेण्यात आले होते. यावेळी सर्व स्थानिक बेरोजगारांना कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यावरून ब्राह्मणी येथील काही तरुणांना कामावर घेण्यात असले होते. व निळापूर येथील युवकांना सातत्याने भूलथापा देण्यात येय होत्या त्यामुळे वॉशरीज विरोधात चांगलाच रोष वाढला होता. म्हणून आज सर्व बेरोजगार युवक व त्यांचे कुटुंबियांना घेऊन आज कोल वॉशरीजचा अचानक कोळसा रोको आंदोलन घेण्यात आल्याने वॉशरीजच प्रशासनाकडून दाखल घेण्यात आली व बुधवारी यावर कायम स्वरूपी तोडगा काढायचे आश्वासन दिले आहे. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, महासचिव मिलिंद पाटील उपाध्यक्ष मंगल तेलंग यांचे मार्गदर्शनाखाली विधान सभा अध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित युवा आघाडीचे शहराध्यक्ष विशाल कांबळे निलेश मंगाम,आशिष चटप, अजय चटप, बंडू हनुमंते, गणेश चटप, अरविंद येसेकर अक्षय आवारी नामदेव कडुकरं , विजय पारखी, ओम चटप, निखिल पारखी, यांचेसह असंख्य महिला उपस्थित होत्या.
बुधवारी निर्णय न झाल्यास आणखी कोळसा जाम होण्याची शक्यता
स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कोळसा रोको आंदोलन केल्याने वॉशरीज प्रशासनाने बुधवार पर्यंत वेळ मागितला असून सर्व बेरोजगारांना घेऊन बुधवारला सकाळी बैठक लावली लावली आहे. यात बेरोजगार युवकांच्या रोजगारावर निर्णायक भूमिका वॉशरीज प्रशासनाने न घेतल्यास आणखी बेमुद्दत कोळसा रोको होण्याची दाट शक्यता आहे.
