न्यू इंग्लिश हायस्कूल येथे ‘Happy Thoughts’ कार्यक्रमा द्वारे विदयार्थ्यांना मार्गदर्शन “

      

न्यू एज्युकेशन सोसायटी राळेगाव द्वारा संचालित न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, येथे दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या “HAPPY THOUGHTS” या सामाजिक संस्थे द्वारा ” आशा व विकास” याविषयी शाळेतील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद चिरडे यांनी केले.यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना “आशा व विकास” या नावाचे पुस्तके भेट देण्यात आले..’यावेळी न्यू एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष बी. के. धर्मे, सचिव डॉ. अर्चना धर्मे, राळेगाव तहसील च्या नायबतहसीलदार ममता निचत, अनिल राजगुरे, शरद निचत, शारदा उईके, विजय काटकर,मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे हे मान्यवर उपस्थित होते… या वेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक व कौटुंबिक जीवनात ताण तणाव, व आनंदी जीवन कसे जगावे, याकरिता ” HAPPY THOUGHTS” ची कशी मदत होणार याबद्दल आपल्या विचारातून प्रकाश टाकला. यावेळी कार्यक्रमाचे संचालन सूचित बेहरे यांनी केले तर आभार प्रदर्शन करुणा महाकुलकर यांनी केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…….