न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे स्नेहसंमेलन , स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक : माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके

             सहसंपादक :  रामभाऊ भोयर 

राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिंनाक 5 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत संस्थेचे माजी मानद सचिव स्व. केशवराव चिरडे यांच्या जयंती निमित्त शाळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उत्तघाटन दिनांक 5 जानेवारी ला करण्यात आले यावेळी वैराग्य मूर्ती गाडगे महाराज व स्व. केशवराव चिरडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आले . यावेळी माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके हे स्नेहसंमेलनाचे उत्तघाटक म्हणून होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब धर्मे हे होते तर या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार प्रा. न. मा. जोशी , संस्थेच्या सचिव डॉ.सौ.अर्चनाताई धर्मे, राळेगाव ठाणेदार रामकृष्ण जाधव ,तहसीलदार अमित भोईटे, तालुका गटविकास अधिकारी केशव पवार,मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे देवराव जिभकाटे,अरविंद वाढोणकर,संस्थेचे सदस्य सचिन धर्मे, स्वप्नील धर्मे, विनय मुनोत हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक विजय कचरे यांनी केले तर या कार्यक्रमाचे वेळी उपस्थित मान्यवरांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक म्हणून मार्गदर्शन करताना माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके .यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले की, शिक्षण व स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कसे आवश्यक आहे व शिक्षण विद्यार्थ्यांच्या जीवनात किती आवश्यक आहे हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले तर कार्यक्रमाचे शेवटी अध्यक्ष मा भाऊराव धर्मे यांनी शिक्षणक्षेत्रात संस्थेच्या माध्यमातून होणारे बदल स्पष्ट केले. या नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच या नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सास्कृतीक कार्यक्रम व नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. याच कार्यक्रमात शाळे तर्फे, विज्ञान प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा सुद्धा ठेवण्यात आली होती.. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक,प्राध्यापक यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संचालन राजेश काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सूचित बेहरे यांनी केले…. .