गाडगे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश

सहसंपादक : रामभाऊ भोयर

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, युथनेट कार्यक्रमाच्या अंतर्गत पूर्ण भारत भर नवोदय परीक्षा सारखीच बेब्रास चॅलेंजेस ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राळेगाव तालुक्यातील 6 ते 18 वयोगटातील असणाऱ्या 567 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, परंतु या कार्यक्रमा अंतर्गत यवतमाळ क्लस्टर च्या वतीने 507 विध्यार्थ्याने बेब्रास चॅलेंजस परीक्षेमध्ये ऑनलाईन पद्धतीने 15 चॅलेंजेस सोडवली होती. त्या परीक्षेमध्ये पूर्ण भारतातून राळेगाव तालुक्यातील मेंटोर
लीडर मा.प्रमोद कांबळे सर व मेंटोर मा.मयुरी वादाफळे यांच्या कडे असलेल्या अंतरगाव या गावातील शाळा – श्री गाडगे महाराज विद्यालय व क.महाविद्यालय मधील प्रज्वल शरद राऊत वर्ग 10 वी चा विद्यार्थी याने 100 पैकी 98 मार्क घेऊन चौथ्या रँक मध्ये आपले नाव नोंदविले आहे.
याचे प्रथम एज्युकेशन फोउंडेशन यवतमाळ क्लस्टर टीम च्या वतीने आणि शाळेचे तथा महाविद्यालयाचे प्राचार्य मा.राजेश शर्मा सर, ज्येष्ठ शिक्षक मा.राजकुमार तागडे सर, मा. नरडवार सर, मा.सुरपाम सर, मा. पेंदोर मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.