
सहसंपादक: रामभाऊ भोयर
दिनांक 10 जानेवारी रोजी अंतरगाव येथे गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे मुख्यमंत्री संदेश वाचन करण्यात आले,माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना सरकारच्या योजना समजावून सांगण्यात आल्या.. नवीन शैक्षणिक धोरण, तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा, संगीत याबद्दल माहिती देण्यात आली.
मनोवैज्ञानिक चाचणी घेऊन विद्यार्थ्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सरकार कसे प्रयत्न करणार आहे आदी विषयांची माहिती देण्यात आली.मुख्यमंत्री संदेश वाचन अजय नरडवार सर यांनी केले, विद्यार्थ्यांनी वाचन केले, कार्यक्रमाला प्राचार्य राजेश शर्मा, राजकुमार तागडे सर,धंम्मानंद तागडे सर, संदीप सुरपाम सर, नितीन एंबडवार सर, अमोल शेरकी सर व कु. दुर्गा पेंदोर, सहायक शिक्षिका यांनी सहकार्य केले.
