
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील कोरडवाहू शेतकरी बेंबळा प्रकल्पाच्या पाण्यावर त्यांच्या शेत्या अवलंबून आहे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा ज्वारी मका लागवड केली आहे परंतु या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना अचानक कालव्याचे पाणी बंद करण्यात आले पाण्या अभावी पिके सुकण्याच्या मार्गावर आहे तेव्हा आपण बेंबळा प्रकल्पाचे पाणी राळेगाव तालुक्यातील कालव्यात सोडण्यात यावे पाणी सोडल्याने पिके जिवंत राहिल व शेतकऱ्यांचे नुकसान होणार व जनवाराना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळेल ३१ मे पर्यंत पाणी सुरू ठेवण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे दिलिप कनाके तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी, शरद पवार गट यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी बांधवांनी , कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यवतमाळ,तहसीलदार राळेगाव, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग राळेगाव यांच्या कडे करण्यात आली.यावेळी दिलीप कनाके, प्रविण काकडे, संजय भोरे, शंकर रेघे, दिलीप खुडसंगे, पुरषोत्तम राऊत, वासुदेव फरकाडे, मारोती झाडे, राजु शिवणकर,विजु कोवे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते
