
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील ग्रामपंचायत चे सचिव प्रमोद गेडाम यांच्या विरोधात पिंपळगाव येथील ग्रामपंचायत चे उपसरपंच व सदस्य यांनी राळेगाव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. सविस्तर वृत्त असे पिंपळगाव येथील ग्रामपंचायत चे सचिव प्रमोद गेडाम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून उपसरपंच व सदस्य यांनी गटविकास अधिकारी राळेगाव यांच्याकडे १२ फेब्रुवारी रोजी लेखी तक्रार सादर केली आहे. सदर ग्रामपंचायत चे सचिव हे कायद्याच्या नियमाचे उल्लंघन करून गावात शांतता भंग करण्यास प्रवृत्त करत असल्याने सदर सचिवावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व ग्रा.प. रेकॉर्डची तपासणी करून तसेच अनोदी कृत आपसी वाटणी पत्राच्या फेरफराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. असे या तक्रारीमध्ये नमूद केले आहे. सदर ग्रामसभा व मासिक सभा ही प्रोसिडिंग बुकवर लिहिल्या जात नसून कोऱ्या कागदावर ठराव तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठाकडे पाठविला जातो सदर ग्रामपंचायत सदस्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता मनमानी पद्धतीने सचिव हे काम करीत असल्याने गावातील ग्रामस्थ व ग्रा.प. सदस्य त्रस्त झाले असून गावात शांतता भंग होण्याची शक्यता आहे हा प्रकार नव्याने रुजू झालेले सचिव प्रमोद गेडाम यांनी पदभार स्वीकारल्यापासून सतत सुरू आहे तसेच गावातील अनधिकृत आपशी वाटणी पत्रामध्ये बोगस दस्तावरून सचिव यांनी फेरफार नोंदविल्या आहे. त्या रेकॉर्डची तपासणी करण्यात यावी. तसेच मोदी आवास योजनेअंतर्गत पक्के घरे असलेले अतिक्रमण धारकांना एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती असलेल्या अशा बोगस लाभार्थ्यांची सचिव यांनी निवड करून सदर बोगस ग्रामसभा घेऊन ठराव मंजुरीसाठी वरिष्ठाकडे पाठविला आहे.सदर ग्रामपंचायत सदस्य यांनी याबाबत विचारणा केली असता सचिव हे मनमानी कारभार करून अरे रविची भाषा वापरत आहे. तरी सचिव प्रमोद गेडाम यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे या लेखी निवेदनात नमूद केले आहे सदर निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत उपसरपंच अभय मासुळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण रमेश महाजन, सौ शालुबाई टेकाम, सौ रूपा डेंगळे, सौ सीमा बेहरे, नामदेव हुलके, नामदेव मडावी, पदमाकर महाजन यांच्यासह गावातील काही ग्रामस्थ निवेदन देतेवेळी उपस्थित होते
प्रतिक्रिया
वस्तुनिष्ठ तक्रार नोंदवून चौकशी केली जाईल
गटविकास अधिकारी केशव पवार राळेगाव
