
रामभाऊ भोयर
खा.हेमंत पाटील यांच्या धर्मपत्नी यांना यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाची उमेदवारी देऊन यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना आव्हान दिले आहे. सविस्तर वृत्त असे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात निष्ठावंताना डावलून बाहेरून आणलेल्या उमेदवारांना संधी दिल्यामुळे कार्यकर्त्यां मध्ये असंतोष पसरला असून बाहेरून आणलेल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्या साठी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी संकल्प केला असून बाहेरून आणलेल्या उमेदवारांची जागा दाखूवून देण्याची खरी वेळ हीच असल्याचे सांगितले आहे. तर आयात केलेल्या उमेदवारास आपण खासदार बनविणार आहात काय.? असे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये बोलल्या जात आहे. याचा नक्कीच विचार करून हिशोब चुकता करू तसेच आदिवासी समाजातील डॉक्टर जे डिन सारख्या उच्च पदावर कार्यरत होते त्यांना मेडिकल कॉलेजमधील संडासगृह साफ करण्यास भाग पाडून त्यांचा व समाजाचा अपमान करणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी बाहेरच्या जिल्ह्यातुन येऊन आपल्या मतदार संघात निवडणूक लढवीत आहेत. जातीयवादी विचारसरणी असलेल्या अशा नेत्यांच्या पत्नीला तुम्ही खासदार म्हणून निवडून देणार का? तर अशा नेत्यांना धडा शिकवण्याची फार आवश्यकता आहे.यांना एकही मत मिळणार नाही याची खबरदारी घेऊन आदिवासी व ओबीसी समाजाने व यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्ते यांना ही मिळालेली संधी वाया जाऊ न देता हा बाहेर जिल्ह्यातुन आयात केलेला उमेदवार जसाच्या तसा त्यांच्या जिल्ह्यात निर्यात करावा असे आवाहन निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व आदिवासी, ओबीसी बांधवाना केले आहे.
