
बिटरगांव (बु) प्रतिनिधी//शेख रमजान
सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेपाचच्या दरम्यान उमरखेड तालुक्यातील जेवली भागामध्ये पैनगंगा नदीच्या पात्रातील अवैधरीत्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर मंडळ अधिकारी गजानन सुरोशे व तलाठी पंजाब सानप, व कोतवाल वासुदेव जूकोटवार यांनी सापळा रचून धडक कारवाई केली. ट्रॅक्टर पोलीस स्टेशन बिटरगाव येथे आणून एफ आय आर नोंदविला आहे. साडेपाच वाजता च्या दरम्यान ट्रॅक्टर बिना नंबर हेड व ट्रॉली असलेल्या स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर पैनगंगा नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक करताना आढळले. मंडळ अधिकारी यांनी चालकाला थांबवून ट्रॉलीमध्ये असलेल्या रेतीचा परवाना विचारला तेव्हा चालकाकडे कोणताही परवाना नव्हता चालक दिगंबर वैजनाथ बुटले वय वर्ष 23 राहणार बिटरगाव यांनीx सदर रेती पैनगंगा नदीपात्रातून चोरून उत्खनन व वाहतूक करून आणण्याचे सांगितले. स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH-29 CB-0546 व ट्रॉली क्रमांक MH-29 CB-1337 जप्त करून बिटरगाव पोलीस स्टेशन येथे लावलेला आहे.ट्रॅक्टरची अंदाजे किंमत 8,00,000 /- व एक ब्रास रेतीची किंमत 8,000/- रुपये अशी एकूण किंमत 8,0,8000/- आहे. चालकांनी पैनगंगा नदी पात्रातून रेतीची चोरी करून उत्खनन करून मोजे जेवली गावात रेतीची विना गौण खनिज परवाना वाहतूक केल्यामुळे सदर चालकावर भांदवी कलम 379 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चा कलम 48 (7) व 48(8) नुसार पोलीस स्टेशन बिटरगांव (बु ) येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
