
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दि १० मे २०२४ रोजी वडकी येथील शेतकऱ्यांचे शाखा व्यवस्थापक बँक वडकी यांच्या मार्फत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ यांना निवेदन पाठवून शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२४/२५ मध्ये तात्काळ पिक कर्ज वाटप करा अशी मागणी केली सदर निवेदनात आपल्या बँकेने या हंगामासाठी ठरवलेलं पिक कर्ज धोरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने पिक कर्ज मिळण्यापासून दुर करणारे जाचक अटी लादल्याचे दिसत आहे अधिक माहिती घेतली असता असे निर्देशनात आले कि बँकेच्या मंडळाचा दि १२/४/०२४ च्या सभेत या वर्षी पिक कर्जाचे पुरवठा धोरण ठरविण्यात आले आहे त्याप्रमाणे दि २४ एप्रिल रोजी परिपत्रक काढून पिक कर्ज वाटप करण्याची दिशा ठरविण्यात आली आहे व तीन टप्प्यांत विभागणी केली सतत पाच वर्षांपासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात तसेच तीन ते पाच वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात व एक ते तीन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यात कर्ज वाटप केले जाणार आहे परंतु असे शेतकऱ्यांच्या विरोधात मनमानी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आत्महत्येच्या मार्ग मोकळा करुन राहीले वाढती महागाई लक्षात न घेता आपण पिक कर्ज वाढीव मर्यादीचा विचार केला नसुन पेरणी चा हंगाम जवळ आला आहे तरी शेतकऱ्यांना खरीप हंगाम पिक कर्ज वाटप केले नाही तरी आपण शेतकऱ्यांच्या विचार करून जसे आज पर्यंत सोसायटी मार्फत पिक कर्ज वाटप केले जात होते आता ही आपण शेतकऱ्यांना सोसायटी मार्फत च सात दिवसांत पिक कर्ज वाटप करण्यात यावे अन्यथा आपल्या शाखेसमोर अमारण उपोषण ला बसण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी त्र्यंबक महाजन, डॉ अशोक फुटाणे, सोमेश्वर पिंपराडे, कृष्णा कुमार मोहता, दिलीप बांगरे,अरूण फुटाणे, गजानन देठे, सचिन फुटाणे, राजेंद्र कोंबे, सुभाष राऊत कवडुजी गोंबाडे, गजानन डवरे, राजु देठे दिगाबर हनुमंते आदी शेतकरी बांधव उपस्थित होते
