ढाणकी शहर बनले अवैध सावकारीचे हब डोअर टू डोअर कलेक्शन व वसुली करणारी यंत्रणा ठरत आहेत पंटर


प्रतिनिधी::प्रवीण जोशी ,
ढाणकी


सध्या शेतकऱ्याचा खरीप हंगाम जवळ येतो आहे. त्यामुळे कृषी निविष्ठा व इतर सर्व बाबीच्या खरेदीसाठी त्यांना नितांत रकमेची गरज असते. मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींना पैशाची गरज भासते या सर्व बाबीचा विचार करून डोअर टू डोअर फिरणारी कलेक्शन यात्रा व्याजाने पैसा कोणाला पाहिजे याच्या शोधात असते व सावकारी करणारे यांना कमिशन देऊन यथोचित काम करून या यंत्रणेद्वारे उपयोग करून हा धंदा मोठ्या प्रमाणात उत्तेजित झाला आहे. मध्यमवर्गीना सावकारीचा फास आवळत असल्याचे जिवंत घडामोडी घटना होताना दिसत आहेत. तसेच शेतकरी व कर्ज घेणारा कर्जदार यांच्या विरोधात कर्ज रकमेबद्दल विचारणा सुद्धा करू शकत नाही कारण भविष्यातील कर्जाचे काम होणार नाही याची भीती कुठेतरी कर्जदाराला भेडसावते त्यामुळे अवैध सावकार मात्र रक्कम मोठ्या प्रमाणात वाटत असताना व्याजदर पंचेव्विस टक्के दराने पैसे देण्यात येत आहेत?? मोठ्या प्रमाणात व्याज आकारणी करून सावकारी चालू असल्याचेही बोलल्या जात आहे.
ढाणकी ही व्यापार पेठ मोठी असून आजूबाजूला प्रचंड खेडेगाव वसलेली आहे त्यामुळे सावकारीचा फास हा शेतमजूर शेतकरी परिवाराशी संबंधित आहे राष्ट्रीयकृत बँका मार्फत तसेच कार्यरत पतसंस्थांकडून कर्जदारांना विलंब व पिळवनुकीमुळे शेतकरी व गरजवंत सावकाराच्या दाराला उभा ठाकतो जे सावकार परवानाधारक आहे अशा कर्ज धारकांना कर्ज देताना काही मापदंड ठरवून दिलेली असते पण भरमसाठ व्याजदर असलेल्या रकमा देऊन त्यांची परतफेड करणे सर्वसामान्यांना परवडत नाही. शासनाने ठरवून दिलेल्या व्याजदरा पेक्षा त्यांचे व्याजदर कितीतरी पटीने अधिकच असते.

प्रामुख्याने शेतीमालावर स्थानिक लोकांची गुजरान चालते पण प्रमुख पिकाला न मिळणारा भाव, मुख्य पिकांची निसर्गाने केलेली हानी, उत्पादन कमी, खर्च मात्र वाढीव स्वरूपातील, मध्यमवर्गीय कुटुंबातील होणारी लग्न, तसेच एखाद्या खर्चिक आजाराची लागण झाल्यास खाजगी सावकाराकडे गेल्याशिवाय पर्याय नसतो आणि सर्वसामान्य या व्याजदराच्या लुटीत अडकतो

या व्याजाच्या व्यवसायामध्ये उच्च विद्याविभूषित समाजातील नामवंत नागरिकांसह स्वयंघोषित समाजसेवक, शासकीय नोकरीत असणारी मंडळी मोठे मोठे व्यवसाय थाटून बसलेले दुकानदार सध्या आढळून येतात. त्यामुळे अनेक जनसामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडले असून या सर्व बाबींच्या मनस्तापा मुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत आहे ढाणकी शहरात छोटी मोठे व्यवसाय करणारे हातगाडी वाले पानटपऱ्या असा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे अनेकांकडे व्यवसायाला लागेल एवढी भांडवल नसते त्यांचा चुकीचा फायदा घेऊन एका दिवसाचे पैसे देऊन मोठ्या प्रमाणात व्याज आकारल्याचे कळते .विशिष्ट व्यक्तीमार्फत भिशी चालवली जाते त्यात अनेक व्यापारी समूह करून भिशीची किंमत होते त्यामधून काही भिशीतून ठरल्यानुसार पैशाचा वाटप होते त्याची व्याजदराची आकारणी तीस ते पस्तीस टक्के आकारल्या जात असल्याचे बोलल्या जाते .रक्कम भरताना हप्ता चुकला तर चक्रवाढ व्याज आकारणी होऊन कर्ज रक्कम असेल तर काही रक्कम थकीत राहिल्यास ही रक्कम पन्नास ते साठ हजाराच्या हजाराच्या घरात पोहोचते.


चौकट::


अनधिकृतपणे कर्ज देऊन अव्वाच्या सव्वा व्याजदराची आकारणी केल्यास कायद्याच्या चौकटीत राहून कडक कारवाई करण्यात येईल कर्जदारांनी न घाबरता समोर येऊन तक्रार करावी सावकारी विरोधात महाराष्ट्र शासनाचा कडक कायदा असून सावकारी अधिनियम २०१४ चे अन्वये दंडात्मक कारवाई करू व ज्या व्यक्तींनी सावकारीच्या विरोधात आवाज उठविला त्याचे नाव सुद्धा गुपित ठेवण्यात येईल

ठाणेदार__प्रेमकुमार केदार
बिटरगाव ( बु) पोलीस स्टेशन