.

सहसंपादक : रामभाऊ भोयर
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निर्विवादपणे यश संपादित केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्याकरिता व येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात नियोजन करण्याकरिता जिल्हा प्रमुख किशोर भाऊ इंगळे, उप जिल्हा प्रमुख राजु भाऊ मांडवकर, राळेगाव विधानसभा संघटक डि.बी मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रमुख महोदय यांनी बुथप्रमुख,बि.एल.ओ,गट प्रमुख नेमण्याचे आदेश तालुका प्रमुख व शहर प्रमुखाला देण्यात आले. सर्व प्रभाग व्हाईस नियोजन करण्यासंदर्भात सुचना देण्यात आल्या. या बैठकीला प्रमुख उपस्थितीत विनोद भाऊ काकडे (तालुका प्रमुख),इम्रान पठाण (शहर प्रमुख), दिपक येवले (उप शहर प्रमुख), सुनिल सावरकर (उप शहर प्रमुख), सुनिल क्षिरसागर (व्यापारी आघाडी शहर प्रमुख),योगेश मलोंडे ,अंकुश गेडाम(शाखा प्रमुख), रोशन उताने (गट प्रमुख), आदेश आडे,गौरव ठाकरे, सिद्धांत थुल,राहुल चौहान, किशोर कापसे,गौरव खामनकर,अनूप आत्राम,मोहसीन पठाण, स्वप्नील पुरी,महादेव पोंगडे,अभय नेहारे धनराजजी श्रीरामे काकाजी, महिला आघाडीच्या पार्बताबाई मुखरे काकु,प्रगती कावळे,अमोल राऊत,अखिल निखाडे,वृषभ दरोडे,प्रशांत भाऊ वाऱेकर,सह महिला आघाडी चे पदाधिकारी व शिवसैनिक यांची उपस्थिती होती.
