
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्यातील सर्व शिधावाटप / स्वस्त धान्य दुकानदाराच्या प्रलंबित न्याय, हक्क मागण्या पुर्तता करून ,धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडिअडचणी सोडवणुक करण्याबाबत महासंघाने शासन स्तरावर वेळोवेळी दिलेली निवेदने अखिल भारतीय महासंघ राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक महासंघ पुणे कडुन प्रमुख निवेदनाव्दारे तहसीलदार राळेगाव यांचे मार्फत शासन स्तरावर विनंती करण्यात येत आहे.मागील अनेक वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारकाच्या मागण्या अडीअडचणी व समस्या याची सोडवणुक करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये शासन स्तरावर कोणतेही कार्यवाही झालेली नसुन त्या अनुषंगाने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
दिनांक २० जानेवारी २०२४ अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांन सोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीत राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक यांना मिळणाऱ्या कमिशन मध्ये ५० रुपये वाढ करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.
लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल असे सुतावेज अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याकडुन बैठिकीच्या वेळी करण्यात आले होते. परंतु आजपर्यंत या विषयावर कोणत्याही निर्णय झाला नसुन या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांन सोबत कोणतेही बैठक झालेली नाही.
त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात राज्य सरकारने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांन सोबत चर्चा करुन स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक यांच्या विवीध मागण्याची पुर्तता करण्यात यावी याकरिता राळेगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक संघटनेच्या वतीने राळेगाव तहसीलदार अमित भोईटे यांनी निवेदन देण्यात आले.
रमेश लढे अध्यक्ष राळेगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक संघटना, सुरेश पेंद्राम उपाध्यक्ष,दिलीप निखाडे सचिव, सदस्य मोरेश्वर चंदेनखेडे, विलास भुजाडे, धनराज लाकडे, अमोल केवटे, अमोल जवादे, पांडुरंग वानखडे, सी.सी.बोटरे,राजु दुधेवार, अंकुश गव्हाणकर, सचिन मेश्राम व इतर राळेगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
