सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्थळावर ९० दिवसाचे बांधकाम कामगार मजुराच्या प्रमाणपत्रासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड होत असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे बांधकाम विभागामार्फत मजुरांसाठी विविध योजना चालविण्यात येत आहे. बांधकाम मजूर म्हणून ९० दिवस काम केल्याचे ग्रामसेवचे प्रमाणपत्र, नोंदणी करणे कामी ग्राह्य धरण्यात येते व या प्रमाणपत्राचे आधारे बांधकाम मजूर म्हणून नोंदणी केली जाते वरील प्रकारची नोंदणी प्रक्रिया राबवत असताना ग्रामसेवक यांनी सदर कामगार हा कोणत्या नोंदणीकृत कॉन्ट्रॅक्टदाराकडे काम करतो, त्याचा परवाना आहे का ? ९० दिवस काम केल्याबाबत दिनांकापासून हजेरीपटावर कॉन्ट्रॅक्टदाराची स्वाक्षरी आहे का ? ज्या कामगाराच्या खात्यात ठेकेदाराने पैसे जमा केले. असल्यास बँक स्टेटमेंट, किंवा नगदी पैसे दिले असल्यास त्या ठेकेदाराचे प्रमाणपत्र आहे का ? कामगारांने कोणत्या कामावर काम केले त्या कामाचे नाव व वर्क ऑर्डर कामगाराचा मंजूर म्हणून ठेकेदाराने विमा उतरवला आहे का? या सर्व बाबीची पडताळणी करून ग्रामसेवकांनी मजुरांना ९० दिवसाचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी लागणारे दस्तऐवज
(१) सदर कामगार हा ग्रा.प. कार्य क्षेत्रातील वास्तव्य करणारा असावा
(२)९० दिवस काम केल्याबाबतचा सक्षम पुरवा असावा
(३) बांधकाम कामगाराची मजुरी रक्कम अदा केल्या बाबत बँक पासबुकची झेरॉक्स असावी कीवा नगदी दिल्यास कॉन्ट्रॅक्टदाराचे किंवा मालकाचे प्रमाणपत्र असावे.
वरील दिलेल्या संपूर्ण कागदाची पूर्तता केल्यावरच आम्ही कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्र देणार
ग्रामसेवक ग्रा.प.
चिखली/ विहिरगाव
कुमारी आरती वडुले
