
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या तसा तसा राळेगाव विधानसभा मतदारसंघात नवनवीन उमेदवार आपली ताकद वेगवेगळ्या प्रकारे दाखवायला सुरुवात करायला लागले असून हा मतदारसंघ अनुसूचित जमाती
उमेदवारांसाठी राखीव असून या मतदारसंघात अनेक उच्चशिक्षित उमेदवार इच्छुक आहेत अनेक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवार अर्ज सादर केला असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी बऱ्याच उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला असून काही उमेदवार तिकीट मिळाली तर निवडणूक लढू अशा मानसिकतेत आहे तर काही पक्षांनी तिकीट दिले नाही तरी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.या निवडणुकीत अनेक उच्चशिक्षित उमेदवार असले तरी मात्र यांचं फक्त पाहूण्यासारखं आगमन झालं असून प्रत्येक उमेदवार अनेक नेत्याद्धारे आपल्यालाच हमखास तिकीट मिळणार असल्याचा दावा करत असून जे काही उमेदवार अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ आणि इमानदारीने काम करत आहे आणि तिकीट मिळो की न मिळो हा आमचा पक्ष आहे आणि पक्षाने दिलेल्या उमेदवारांचे काम करायचे आहे.वास्तविकता अशी की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके सर हे अनेक वर्षापासून या पक्षात प्रामाणिकपणे काम करत असून त्यांना मतदारसंघात दांडगा परिचय असून पुर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे.त्यांचा मतदारसंघातील तरूण, जेष्ठ, वयोवृद्ध मतदाराशी चांगली ओळख असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तिकीट प्राध्यापक वसंत पुरके सरांना मिळाल्यास निश्चितच ही निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोपी जाईल असा जनतेतून सुर निघत असले तरी पण भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार प्राचार्य डॉ अशोक ऊईके हे सत्तेतील आमदार आहेत माजी मंत्री राहीले असून त्यांचे कार्यकर्ते सुद्धा ऊईके सरांनी केलेल्या कामाचा पाढा वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असून शासनाने आणलेल्या अनेक योजनेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचवत असले तरी एकंदरीत सध्याचे वातावरण सत्तेवरील सरकारबाबत अजूनही नाराजी व्यक्त करत असून या छोट्या मोठ्या योजना देण्यापेक्षा शेतकऱ्यांना कापूस,तुर, ज्वारी,गहू, हरभरा अशा शेतीतून पिकणाऱ्या मालाला परवडणारा भाव द्यावा.जंगली जनावरं हळूहळू शेताकडे, गावाकडे मार्गक्रमण करत असल्याने हिंस्त्र पशू पासून भिती निर्माण झाली असल्याने शेतकरी शेतमजूर यांना जिव मुठीत घेऊन जावे लागत असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांना शासनाकडून ताराचे कुंपण द्यायला पाहिजे.अशा अनेक विषयाकडे शासनाने लक्ष न दिल्याने येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार प्राचार्य डॉ अशोक ऊईके सरांना सुद्धा एवढे सोपे नसून अशातच नव्याने मैदानात उतरलेले सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अशोक मेश्राम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तिकीट मागितले असले तरी तिकीट मिळण्याची वाट न पाहता आपलं प्रदर्शन सुरू केलं असून राळेगाव मतदार संघातील तीन्ही तालुक्यात आपला परिचय पोहचविला असून वेळप्रसंगी ते अपक्ष सुद्धा निवडणूक लढू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.सोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते किरण कुमरे सुद्धा पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून यांच्या सह डझनावर उमेदवार आमदार बनण्याची स्वप्ने पाहत असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांना ही निवडणूक सोपी नसल्याचे मतदाराचा हवाला घेतला असता दिसून येत असून लवकरच मतदार राजा येत्या निवडणुकीत आपला योग्य आमदार निवडून देणार असल्याचे मतदारांच्या प्रतिक्रिया दरम्यान दिसून आले.