
ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी.
ढाणकी प्रभाग क्रमांक तीन येथील सिमेंट रस्त्याचे निकृष्ट दर्जाची काम करून अर्धवट रस्ता दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकून व निकृष्ट रस्त्यास जबाबदार असणाऱ्या तत्कालीन बांधकाम अभियंता यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आजाद समाज पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे दिनांक 6 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी ढाणकी यांच्याकडे करण्यात आली
येथील प्रभाग क्रमांक तीन मधील माधव अलकटवाड यांच्या दुकाना समोरील ते सुरेश जी जयस्वाल यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम संबंधित कंत्राटदार व तत्कालीन बांधकाम अभियंता यांच्या संगनमताने करण्यात आले होते , याबाबत 9 मे 2023 रोजी सदर निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्यात यावी दुरुस्ती न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा जॉन्टी विनकरे यांनी दिला होता, सात जून 2023 रोजी येथील रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी मोबाईल टॉवर चढून शोले आंदोलन सुद्धा करण्यात आले होते या आंदोलनादरम्यान तत्कालीन बांधकाम अभियंता यांनी निकृष्ट दर्जेचा झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासन दिले होते तर तत्कालीन मुख्याधिकारी यांनी 31 मे 2024 रोजी लेखी पत्राद्वारे सदर रस्त्याचे शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांच्यामार्फत लेखापरीक्षण करून अहवालाची प्रत आपणास देण्यात येईल आश्वासन दिले होते, परंतु आज तागायत नगरपंचायत प्रशासनातर्फे लेखी अहवाल देण्यात आला नाही सदर रस्त्याची दुरुस्ती अर्धवट करून संबंधित कंत्राट दाराने इथून पोबारा केला याविषयी नगरपंचायत प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, रस्ता दुरुस्तीस दिरंगाई करणाऱ्या प्रभाग क्रमांक तीन येथील जनतेस वेठीस धरणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला काळया यादीत टाकून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवण्यासाठी संगणमत करणाऱ्या तत्कालीन बांधकाम अभियंता यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी सदर रस्त्याचा लेखा परीक्षण अहवाल तात्काळ देण्यात यावा याबाबत नगरपंचायत प्रशासनातर्फे दहा दिवसाच्या आत लेखी स्वरूपात माहिती द्यावी अन्यथा नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात आजाद समाज पार्टीतर्फे नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे , शहर अध्यक्ष गोलू भाऊ मुनेश्वर, युवा तालुका अध्यक्ष विष्णुकांत वाडेकर, महासचिव समाधान राऊत उपाध्यक्ष धम्मपाल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे
