
सहसंपादक : रामभाऊ भोयर
् भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांना भाजपाचे माजी आमदार तरविंदरसिंह, राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका जबाबदार व्यक्तिमत्वाबद्धल अशोभनीय वक्तव्य करून म्हणजे राहूलजी गांधी यांची जीभ तोडा ,राहूलजी गांधी यांच्या जीभेला चटके द्यावे अशा प्रकारे न शोभणारे शब्दप्रयोग करून देशात,महाराष्ट्रात, जिल्ह्यात , तालुक्यात गावागावात तरूण युवक महिला जेष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण केले आहे. हे तीघेही भाजपा आणि मित्र पक्षाचे नेते असून भाजपाचा काळा चेहरा जनतेसमोर आला असून या तिन्ही नेत्यांना केंद्रातील व राज्यातील सरकार पाठीशी घालत आहे.शासनाने यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून कार्यवाही करणे आवश्यक असताना अजूनही या वाचाळविरांना ताबडतोब शासनाने अटक केली नाही.त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून या तिन्ही नेत्यांना तात्काळ अटक करावी यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अँडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या नेतृत्वाखाली या नेत्यांना अटक करण्यासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि ताबडतोब अटक न झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला त्यावेळी पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
