नवीन चेहरा म्हणून जनता मला स्वीकारेल : अशोक मेश्राम, राळेगांव मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

जनतेतून मला चांगला प्रतिसाद आहे नवीन चेहरा म्हणून मला जनता स्वीकारेल जगाला हेवा वाटेल असे काम राळेगांव मतदारसंघात माझ्या हातून होईल अशी प्रतिक्रिया मनसेचे राळेगांव विधानसभेचे उमेदवार अशोक मेश्राम यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज नुकताच आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत सादर केला.ते बोलताना पुढे म्हणाले राळेगांव विधानसभा मतदारसंघात शाश्वत विकास करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व पुढे घेऊन जाण्यासाठी मी उभा आहे. विकास काय असतोय हा मला दाखवून द्यावयाचा आहे.

जगाला हेवा वाटावा असे काम सन्मानीय राज ठाकरे करत आहेत राळेगांव मतदार संघ सुसज्ज करण्यासाठी मी उभा आहे. पर्यावरण, पर्यटन, सांडपाणी, घनकचरा, तसेच जनतेच्या मूलभूत गरजा यासाठी मला काम करायचे असून माझे व्हिजन आणि मिशन एकच असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले.उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी त्यांचे अनेक चाहते आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते.