राळेगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्ष पदी ॲड. प्रफुल्ल चौहाण तर सचिव पदी ॲड.वैभव पंडीत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी राळेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय राळेगाव, येथील राळेगाव तालुका वकील संघाची बैठक झाली, या बैठकी मध्ये वकील संघाच्या २०२५ या वर्षासाठी अध्यक्ष व सचिव यांची एकमताने निवड करण्यात आली. राळेगाव तालुका वकील संघाच्या सर्व सदस्यांनी सर्वानुमते बिनविरोध अध्यक्ष म्हणून ॲड. प्रफुल्लसिंग चौहाण तर सचिव म्हणून ॲड. वैभव पंडीत यांची निवड केली.
यावेळी राळेगाव वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲड. किशोर मांडवकर, ॲड. अलोने, ॲड.मोहन देशमुख, ॲड. संदेश झामड, ॲड. अफसर काझी, ॲड. संदीप राडे, ॲड. एच. बी. चौधरी, ॲड. प्रितेश वर्मा, ॲड. चेतन गलाट, ॲड. दीक्षांत खैरे, ॲड. वैशाली मोंडे, ॲड. गायत्री बोरकुटे, ॲड.दीपक जुमनाके, ॲड. प्रशांत लांजेवार, ॲड. योगेश ठाकरे, ॲड. निलेश गोंदे, ॲड. लौकिक आगलावे, आदी सर्व सदस्य उपस्थीत होते.