
ग्राम रोजगार सेवकावर हल्ला करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होत नाही.
ग्राम रोजगार सेवक संघटना (सचिव) राजू लांडे राळेगाव
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथिल ग्राम रोजगार सेवक अमोल गाताडे यांच्यावर एका उपोषण कर्त्या महिलेच्या भावाने व वडिलांनी प्राणघातक हल्ला केल्यामुळे त्यांच्या विरोधात ग्राम रोजगार सेवक संघटना राळेगाव यांच्या वतीने २१ जानेवारी रोजी गटविकास अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे आष्टोणा येथिल विधवा महिला विद्या सुर ही महिला घरकुल संबंधित उपोषणाला बसली होती यासंदर्भात उपोषणा स्थळी १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भेट देण्यासाठी गटविकास अधिकारी केशव पवार, वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे, आष्टोणा येथिल ग्रामपंचायत सचिव आरती वडुले उपोषण स्थळी भेट देत असता ग्राम रोजगार सेवक अमोल गाताडे यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून जीपीएस द्वारे फोटो व व्हिडिओ काढले होते परंतु उपोषण करत्या विद्या सुर यांचे भाऊ योगेश सुधाकर पावडे व त्यांचे वडील सुधाकर सखाराम पावडे यांनी रोजगार सेवक अमोल गाताडे यांच्यावर प्राण घातक हल्ला केला आहे. सदर याबाबत ग्रामरोजगार सेवक संघटना राळेगाव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदन देतेवेळी ग्राम रोजगार संघटना (अध्यक्ष) विलास पवार, राजू लांडे (सचिव) प्रभुदास बावणे, मयूर जुमळे, यशवंत वैद्य, आकाश शिरसागर, अमोल काताडे, निलेश भगत, संजय कांबळे, नरेश देशमुख, रामचंद्र गेडाम, सचिन भडक, नितेश तिवाडे, प्रशांत, बळीराम बावणे, सुनील पायघन, दीपक दूधकोहळे, गजू नहाते, अंबादास टेकाम, धनराज तोडसाम, प्रवीण खेवले, ऋषिकेश नहाते, शुभम झाडे, प्रीतम इंगोले, प्रशांत, अनिल बावणे, वासुदेव सीडाम, विनोद भोयर, बलदेव राठोड, सुभाष उपस्थित होते
प्रतिक्रिया
मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे मी माझ्या येथील ग्राम रोजगार सेवकांना सांगितले की उपोषणा स्थळी आपले वरिष्ठ अधिकारी व वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी भेट दिली याचे आपल्याकडे पुरावे असावे यासाठी मी त्यांना फोटो व व्हिडिओ काढण्यात सांगितले होते. परंतु असे एखाद्या कर्मचाऱ्याला मारहाण करणे हे चुकीचे आहे. अशा मारहाण करणाऱ्या वर नक्कीच कारवाई करायला पाहिजे
आरती वडुले
सचिव ग्रामपंचायत आष्टोणा