
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शहरात भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत उभारली असून या इमारतीमध्ये थंड पिण्याच्या पाण्याचे आरो बसविण्यात आले होते या आरो मधून सुरवातीला नागरिकांना थंड पाणी मिळत असे मात्र आता सध्या तरी या प्रशासकीय इमारतीतील तसेच पंचायत समिती च्या इमारतीमधील असलेले आरो बंद असून असलेले थंड पाण्याचे आरो शोभेची वस्तू दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी
महत्त्वाचे ठिकाण म्हणजे तहसील – कार्यालय,पंचायत समिती कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने कामकाजाकरिता येणाऱ्या नागरिकांना पान टपरीवर किंवा हॉटेलमधून विकतचे पाणी प्यावे लागत आहे त्यामुळे नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी असलेले बंद आरो चालू करून नागरिकांना पिण्याचे पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
तसेच शहरातील असलेल्या तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र,एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय,पोलिस स्टेशन,भूमी अभिलेख कार्यालय आदी विविध शासकीय कार्यालय मध्ये पाहणी केली असता एकाही कार्यालयात कामाकरीता येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे. मात्र या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी स्वतःसाठी घरून पाणी आणतात किंवा एखादे पाण्याची कॅन घेवून आपली सोय करतात मात्र खेड्यातून शासकीय कामाकरीता दररोज येणाऱ्या शेकडो नागरिकांना हॉटेलमधून पाणी साधे पाणी प्यावे किंवा पाण्याची बॉटल विकत घेवून तहान भागवावी लागत आहे. सध्या तरी उन्हाळ्याचे दिवस असल्याने या उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे त्यामुळे संबंधित कार्यालय प्रमुखांनी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे
पंचायत समिती कार्यालयात असलेल्या बोरला पाणी नसल्यामुळे येथील आरो ला पाणी नाही तसेच मी या कार्यालयात रुजू झालो त्या अगोदर पासूनच हे आरो असेच होते
गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव
