

सहसंपादक: रामभाऊ भोयर
लोकेश दिवे मित्रपरिवारातील क्षितिज घायवटे यांच्या तर्फे चिखली येथील अंगणवाडी मध्ये बालमित्रांना डिजिटल पाट्याचे व चॉकलेट चे वाटप करण्यात आले, यामागील उद्देश फक्त एवढाच आहे की लहान मुलांना अंगणवाडी मध्ये शिक्षणासाठी येण्याची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना लिखाणाची सवय लागावी असा आहे,यावेळी लहान लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले पुढेही असेच लोकहिताचे सामाजिक कार्यक्रम होत राहणार असे लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे सांगण्यात येत आहे,यावेळी लोकेश दिवे मित्रपरिवारातील लोकेश दिवे,दुर्वेश उमाटे,स्वप्नील ठाकरे,क्षितिज घायवटे,साहिल वनकर, सारिपुत्र वनकर यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
