
सहसंपादक : – रामभाऊ भोयर
दिनांक ४ ऑगस्ट रोजी राळेगाव शहरात अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि अभिनेते स्व. किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कलाविष्कार संच, राळेगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. सन १९९५ साली स्थापन झालेल्या कलाविष्कार संचाने यंदा आपले ३० वे वर्ष पूर्ण केले आहे. विविध क्षेत्रांतील व्यावसायिक आपली कला आणि मैत्री जोपासत आजही संगीत साधनेत सक्रिय आहेत.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि संचालक श्री. अशोकभाऊ कोल्हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जीवनभाऊ खानगन, निखिल इंगोले, प्रकाश कळमकर, प्रकाश धातकर, संतोषभाऊ घानमोडे, धर्मा आटे, प्रमोद वातारी, रोशन आडे, श्री. थूल सर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बाळासाहेब धुमाळ, डॉ. कुणालजी भोयर, सौ. छाया पिंपरे, मेघश्यामजी चांदे, श्री. भूपतभाई कारिया, डॉ. कोकरे, श्री. दिलीपभाऊ धुधगीकर,
सामाजिक कार्यकर्ते युसुफ अलीजी, गुरुदेव सेवा मंडळाचे श्री. गंगाधर घोटेकर आणि श्री. वाल्मीक मेश्राम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. थूल सर यांनी केले. प्रास्ताविक सौ. भावना खानगन यांनी सादर केले, तर किशोर कुमार यांच्या जीवनचरित्रावर श्रीमती लीला पेंडोर यांनी रसपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमात “किशोर कुमार की सुनहरी यादें” या संगीतमय सादरीकरणात गायिका निशा थोरात, कु. श्रद्धा कोल्हे, श्री. रोशन आडे, श्री. संतोष घानमोडे, श्री. दांडेकर सर, प्रकाश कळमकर, श्री. सानप साहेब आणि श्री. विनोद ठाकरे यांनी किशोर कुमार यांची अजरामर गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, तसेच स्व. किशोर कुमार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कलाविष्कार संचाचे संचालक श्री. अशोकभाऊ कोल्हे यांनी केले.
